ताज्या बातम्या

कै.एकनाथ दत्तात्रेय सुर्यराव यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान व मोफत औषध वाटप

प्रतिनिधी : कै. एकनाथ दत्तात्रेय सुर्यराव यांच्या १ जुलै रोजी होणाऱ्या जयंती च्या पूर्वसंध्येला त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन म्हणून श्री. प्रसाद एकनाथ सुर्यराव यांच्या पुढाकारातून, करुणा सेवा ट्रस्ट व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयाबाहेर भव्य अन्नदान तसेच गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाला महाराष्ट्रासह परराज्यातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. अन्नदानासाठी लाभार्थ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेकडो गरजू नागरिकांनी या सेवाभावी उपक्रमाचा लाभ घेतला.

स्वर्गीय एकनाथ दत्तात्रेय सुर्यराव यांनी आयुष्यभर जपलेला समाजसेवेचा वारसा त्यांचे सुपुत्र श्री. प्रसाद सुर्यराव समर्थपणे पुढे नेत असून, गरजूंच्या मदतीसाठी सातत्याने विविध सेवाभावी उपक्रम राबवत आहेत.

वडिलांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम त्यांना वाहिलेली खरी आदरांजली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि मानवसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Scroll to Top