

प्रतिनिधी – धगधगती मुंबईच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी सदर कार्यक्रम २४ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केला होता. यावेळी राजकीय युवा नेता पुरस्कार २०२४ हा बॅरिस्टर संग्राम शेवाळे यांना जाहीर केला होता. मात्र
वर्धापन दिनी ते काही कारणास्तव उपस्थित राहिले नव्हते तो पुरस्कार आज त्यांना मुंबई येथे देण्यात आला,यावेळी त्यांच्यासोबत ऍड शुभम मोहिते,कुणाल करडे,संपादक भिमराव धुळप सह भगवान साळवी उपस्थित होते.