मुंबई : मालाड (पूर्व) येथे मंजूर करण्यात आलेल्या शिधावाटप कार्यालयाकरिता जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी औचित्याच्या मुद्द्यादवारे बुधवारी विधानसभेत केली
बुधवारी विधानसभा सभागृहात शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मालाड पूर्व येथे शासनाच्या आदेशानुसार हा शिधावाटप कार्यालयासाठी जागेची मागणी केली असता मुंबई उपनगर यांना संबंधित विभागाचे अधिकारी व मी स्वतः कळवून देखील अद्याप याबाबतचा प्रस्ताव तयार करुन व शासनास सादर करुन मंजूरी साठी जिल्हाधिकारी यांनी कोणतीच कार्यवाही केली नसल्यामुळे प्रस्तावित शिधावाटप कार्यालयास जागा मिळण्याकरिता शासनाकडून अक्षम्य विलंब होत असल्याने मालाड परिसरातील नागरिकांची शिधावाटप कार्यालया अभावी प्रचंड गैरसोय होत आहे. मतदारसंघ निहाय शिधावाटप कार्यालयाची पुनर्रचना करण्यात आली असून कर्मचारी व शिधापत्रिकाधारक यांच्या सोयीच्या दृष्टीने, मध्यवर्ती ठिकाणच्या जागेचा शोध घेऊन, १ जुलै २०२६ पर्यंत नवीन शिधावाटप कार्यालय सुरु करणे शक्य असल्याचे शासनाने आदेश दिले असून, या आदेशाची प्रत शिधावाटप कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्यानुसार पी/पुर्व विभागातील महापालिकेच्या राखीव जागेपैकी मध्यवर्ती जागेचा शोध घेऊन व जागेच्या प्रस्तावास मंजूरी देण्याच्या दृष्टीने, यांसदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त यांना ११जून २०२६ रोजी लेखी निवेदन देऊनही, अद्याप त्याची दखल घेतली नसून ठिकाणी जागा निश्चित करुन शिधावाटप कार्यालय सुरु करण्याकरिता शासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे केली.




