प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह जयंतीदिनानिमित्त नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य लेखा परीक्षक श्री. राजेंद्र गाडेकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ.अजय गडदे, मुख्य विधी अधिकारी श्री. अभय जाधव, शिक्षण अधिकारी श्री. अशोक कडुस, सहा.आयुक्त श्रीम. स्वरुपा परळीकर व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.




