ताज्या बातम्या

श्री संत रोहिदास दिंडीचे मुंबई ते पंढरपूरकडे २९ जून रोजी प्रस्थान

मुंबई : धारावी येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान व श्री संत रोहिदास सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्र. २४ चा प्रस्थान सोहळा सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून होणार आहे. संस्थापक गुरुवर्य कै. ह.भ.प. पांडुरंग ज्ञानू कारंडे महाराज कराडकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या दिंडीचे यंदाचे ४९ वे वर्ष आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक विधी, पूजन सोहळे व मान्यवरांच्या उपस्थितीत दिंडीचे प्रस्थान होणार आहे.
दिंडी चालक समितीचे अध्यक्ष ह.भ.प. नारायण पाटील महाराज असून, स्वागताध्यक्ष डॉ. शांताराम पांडुरंग कारंडे हे आहेत. दिंडी प्रमुख संचालक व सरचिटणीस वारकरी भूषण ह.भ.प. चंद्रकांत पांडुरंग कारंडे कराडकर यांनी मुंबईतील वारकरी संप्रदायातील वारकरी बंधू, चर्मकार समाज व सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.
Scroll to Top