मुंबई : युवासेना प्रमुख, शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे यांच्या पुढाकारातून महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला विभागप्रमुख तथा आमदार महेश सावंत, स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे, माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, उपविभाग प्रमुख सिद्धार्थ चव्हाण, शाखाप्रमुख प्रवीण नरे, संजय भगत, शाखा समन्वयक रविकांत पडयाची, महिला विधानसभा संघटक आरती किनरे, महिला उपविभाग संघटक रेखा देवकर व नीता राऊल, महिला शाखासंघटक रीमा पारकर, महिला शाखा समन्वयक कल्पना पालेकर, उपशाखाप्रमुख अजय कौसाले, अनंत हरमले, संजय कारेकर, नवीन पेडणेकर, दिलीप गिरी, योगेश महाडकर तसेच गटप्रमुख, ज्येष्ठ शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र वितरक सेनेचे सचिव संतोष देवरुखकर आणि शाळेचे प्राचार्य दीपक वेखंडे यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




