मुंबई : मुंबई मधील पवई मध्ये श्री दुर्वा प्रिय गजानन मंदिर येथे मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी पुरुषोत्तम मास पवित्र परवा निमित्त एक दिवसीय हरिपाठाचे नियोजन करण्यात आले होते मुंबईतील नामांकित हरिपाठ मंडळ श्री संत मोरे माऊली स्वर साधना हरिपाठ मंडळ घाटकोपर यांचे नियोजन करण्यात आले होते या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंकुश महाराज कुमठेकर कोकण रत्न यांच्या नेतृत्वाखाली हा हरिपाठ संपन्न झाला या हरीपाठाला गायनाची साथ बाळकृष्ण महाराज अहिरे महेश कळंबे लक्ष्मण दाभेकर युवराज साळुंखे अमित जाधव यांनी केली व पखवाजाची साथ बालकलाकार सुजल संजय गोगावले, वैष्णव माऊली कळंबे, विघ्नेश लक्ष्मण वाडकर यांनी केली या हरिपाठ मध्ये सर्व लहान मुली व महिला यांचा समावेश होता या भक्ती रंगांमध्ये सर्व नाहून गेल्या आणि या कार्यक्रमांमध्ये आनंद द्विगुणीत केला या कार्यक्रमांमध्ये स्थानिक मंडळातील महिला सहभागी होऊन आनंद घेतला या हरिपाठ मध्ये विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील थोर महिला संत जनाबाई यांनी जसं जात्यावर बसून ओव्या गायला तसं सर्व महिलांनी जात्याचा विशेष आनंद घेतला नवीन पिढीसाठी हे प्रेरणादायी ठरलं या कार्यक्रमाला मुंबईतील सामाजिक,शैक्षणिक,कला,क्रीडा या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन श्री दुर्वाप्रिय गजानन मंदिर अध्यक्ष श्री विलास मार्कल उपाध्यक्ष श्री राजेंद्र देसाई खजिनदार उत्तम चव्हाण तसेच सचिन साळुंखे बाळा राणे धर्माजी वीरकर मंगेश शिंदे यांनी केले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी तरुण मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाची सांगता श्रीच्या आरतीने केली त्यानंतर भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.




