ताज्या बातम्या

साळशिरंबे गावात य. मो. कृष्णा कारखान्याच्या गावभेट दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड :

साळशिरंबे ता. कराड य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या गावभेट दौऱ्यास साळशिरंबे गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कराड दक्षिणचे लोकप्रिय नेते मा. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा पार पडला. यावेळी विकास, सहकार आणि शेतकरी सभासदांशी प्रत्यक्ष संवाद साधून कारखान्याच्या भावी वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली.
दौऱ्यादरम्यान कारखान्याच्या प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना, शेतकरी हिताचे निर्णय तसेच आगामी विकास आराखड्याची माहिती सभासद व ग्रामस्थांना देण्यात आली. गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत करत आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी कृष्णा कारखाना संचालक मा. दयानंद पाटील (भाऊ), मा. दत्तात्रय देसाई (साहेब), कराड पंचायत समिती सदस्य मा. गावडे (साहेब), माजी सातारा जिल्हा परिषद सदस्य मा. हुलवान (साहेब) तसेच कृष्णा कारखाना उमेदवार सौ. शेवाळे मॅडम उपस्थित होत्या.
तसेच गावातील सरपंच सौ. प्रमिला कुंभार, माजी चेअरमन श्री. हिंदुराव पाटील, माजी उपसरपंच मा. वसंतराव मोहिते, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मा. पंकज पाटील, मा. पै. तानाजी चवरे, माजी पंचायत समिती सदस्य मा. तुकाराम पाटील, माजी चेअरमन मा. धनाजी पाटील, भानुदास पाटील, राजेंद्र पाटील, रमेश पाटील, जयकर पाटील, सुरेश पाटील, विलास चवरे, हणमंत यादव, तानाजी पाटील, अंकुश पाटील, हणमंत पाटील, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय बाहेरगावाहून आलेले ज. भो. सहकारी पतसंस्था संचालक मा. हणमंतराव थोरात, सवादेचे माजी सरपंच मा. संजय शेवाळे, भाजपा कराड पश्चिम मंडल अध्यक्ष मा. प्रविण साळुंखे, मा. निळकंठ शेडगे, मा. सादिक महारुगडे (शेठ), धोंडीराम चोरगे, धनाजी भिसे, सागर जाधव, जयप्रकाश माने, साळुंखे सर, डॉ. प्रकाश पाटील, नेताजी पाटील, दिपक थोरात, मोहन शेवाळे, साहेबराव साळुंखे, अशोक पाटील आदी कार्यकर्ते तसेच गावातील सभासद व शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावकऱ्यांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच आमची खरी ताकद असून शेतकरी सभासदांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Scroll to Top