ताज्या बातम्या

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डीवायपीआयएस, वरळी येथे वृक्षारोपण उपक्रम

मुंबई : जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल, वरळी येथे ‘नाऊ फॉर क्लायमेट’ या वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भामला फाउंडेशन आणि गोदरेज इंडस्ट्रीज यांच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

अभिनेत्री आणि उद्योजिका शिल्पा शेट्टी, अजिंक्य डी वाय पाटील समूहाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी वाय पाटील तसेच ईश पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण केले. शाळेची माजी विद्यार्थिनी आणि भामला फाउंडेशनशी संबंधित साहेर भामला यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत हवामान बदल आणि पर्यावरणीय जबाबदारीबाबत मार्गदर्शन केले.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, सामाजिक जबाबदारी आणि समुदाय सहभागाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजावून देण्यात आले. शाळेच्या परिसरात विविध रोपांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रमात पत्रकार फे डी’सूझा, व्यायामतज्ज्ञ यास्मीन कराचीवाला, गायिका कनिका कपूर, नीती मोहन, मंत्री पंकजा मुंडे, जयकुमार रावल, अभिनेत्री लक्ष्मी मांचू आदी मान्यवर उपस्थित होते.

“विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही सक्षम बनवणे ही शाळेची भूमिका आहे,” असे प्राचार्या किनरी शाह यांनी सांगितले. तर “लहान कृतीतून मोठे बदल घडू शकतात,” असे साहेर भामला यांनी नमूद केले.

Scroll to Top