ताज्या बातम्या

येवती प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा

कराड (वार्ताहर) :येवती, ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी राष्ट्रीय डेंग्यू दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी जागतिक डेंग्यू दिन साजरा केला जातो. यावर्षी आरोग्य विभागाच्या वतीने विविध आरोग्य मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अन्सारी , आरोग्य निरीक्षक बाबासाहेब सानप, आरोग्य केंद्राचे कर्मचारी अविनाश खरात गायकवाड, सुजाता गुरव, संगीता कांबळे, एच डी केदार

येवती ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. अन्सारी व सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थ.

याची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आरोग्य निरीक्षक बाबासाहेब सानप यांच्या वतीने येवती प्राथमिक आरोग्य

केंद्रात रुग्ण विभागात आलेल्या रुग्णांना डेंग्यू आजाराबाबत व त्यावरील उपचार तसेच यावेळी घ्यावयाची काळजीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

Scroll to Top