ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र येवती येथे जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा; विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) : जागतिक हिवताप दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र येवती येथे विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करून हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून डेंगू, चिकनगुनिया या आजाराबद्दल माहिती देऊन लोकांना आरोग्य शिक्षण देऊन सर्वेक्षण देखील करण्यात आले,
हिवताप त्याचबरोबर
मलेरिया झाल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात. मलेरिया होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी, यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातर्फे विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. मलेरिया म्हणजे काय, प्रमुख लक्षणे, कारणे, प्रसार, जनजागृती व आरोग्य शिक्षण, वैयक्तिक संरक्षण, आरोग्य सेवा, नागरिकांची जबाबदारी याबाबत आरोग्य निरीक्षक बाबासाहेब सानप यांनी मार्गदर्शन केले, यावेळी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी आशा सेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Scroll to Top