ताज्या बातम्या

दिवंगत विठ्ठल (भाई) चव्हाण जीवनगौरव पुरस्काराने सुरेश काळे यांचा सन्मान

मुंबई : परळ विभागातील सामाजिक कार्यात अग्रणी असलेल्या सुभाष डामरे मित्र मंडळाच्या वतीने विविध जनहित उपक्रम राबवत गेली २५ वर्षे सातत्याने समाजसेवा केली जात आहे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य, गुणगौरव, अनाथ बालकांना आहार वाटप, रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप व वैद्यकीय मदत, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सन्मान अशा विविध उपक्रमांद्वारे मंडळ समाजाशी नाते दृढ करत आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मंडळाचे संस्थापक श्री. आनंद गावंकर व संचालक, शिवसेना सचिव श्री. सुधीरभाऊ साळवी यांच्या नेतृत्वाखाली, तसेच विभागप्रमुख व आमदार श्री. महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ शिवसैनिक व नायगाव-वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक श्री. सुरेश गणपत काळे यांना “दिवंगत आमदार विठ्ठल (भाई) चव्हाण जीवनगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
महर्षी दयानंद (एम.डी.) महाविद्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमात श्री. सुधीरभाऊ साळवी (लालबागचा राजा मानद सचिव) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिवसेना नगरसेविका सौ. उर्मिलाताई पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास सौ. मनीषा सुरेश काळे, मा. नगरसेवक श्री. पराग विठ्ठल चव्हाण, श्री. नाना फाटक, श्री. संतोष कांबळी, श्री. उल्हास पांचाळ, श्री. प्रभाकर मोरजकर, श्री. बबन शिरोडकर, श्री. सूर्यकांत शिंदे, श्री. मुकेश कोळी, श्री. नामदेव ओटवकर, श्री. दिनेश लोखंडे, श्री. रविंद्र कांदळकर, श्री. प्रकाश जाधव, श्री. अमेय भालेकर, श्री. प्रणव व श्री. तेजस सुभाष डामरे, श्री. रुपेश कोचरेकर, श्री. अमर जाधव, श्री. प्रविण वेंगुर्लेकर, श्री. प्रफुल्ल गावंकर, श्री. दीपक गडकरी, श्री. अभिषेक गवाणकर, कु. सुवर्णा गुराम, सौ. नीलम मिरगळ, सौ. नीलाक्षी चेंदवणकर, सौ. वंदना शिंदे, श्री. दीपक पाटील, श्री. हरीश मोरे, श्री. देवदास दिवेकर, श्री. बाळ गुरव, श्री. कृष्णानंद भट, श्री. शैलेश चव्हाण, हुसैन तांबोळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यात समाजसेवेची परंपरा जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करताना, भविष्यातही अशाच उपक्रमांद्वारे जनहिताचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Scroll to Top