ताज्या बातम्या
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेशअकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत; विद्यार्थ्यांना दिलासाभिवंडीत ‘मिथेनॉल’चा मोठा साठा जप्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाईकराड शहर पोलिसांची मोठी कारवाई; 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त, तिघे जेरबंद 18.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; वारुंजी फाट्यावर सापळा रचून छापा कारवाईमहिला व बालविकास आणि ग्रामविकास विभागातील समन्वयाअभावी… राज्यातील “महिला सन्मान” योजनेपासून अनेक कर्तबगार महिला वंचित

सीडीआर प्रकरणी अंजली दमानियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई(रमेश औताडे) : कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
सीडीआर हा अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय डेटा असून तो केवळ कायदेशीर प्रक्रियेनुसार तपास यंत्रणांनाच उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे हा डेटा बाहेर कसा आला आणि त्याचा सार्वजनिक वापर कसा झाला, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे इनामदार यांनी सांगितले.

२०१८ मध्ये समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादानंतर त्यांच्या ओळखीतील अनेक व्यक्तींना फोन करून चौकशी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सीडीआर लीक प्रकरणात अंजली दमानिया यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही इनामदार यांनी दिला.

Scroll to Top