ताज्या बातम्या

स्थानिकांच्या मागणीनुसार, मेट्रो-2 (बी) मार्गिकेतील स्थानकांचे नामकरण करा – माजी खासदार राहुल शेवाळे यांची उपमुख्यंत्र्यांकडे मागणी

मुंबई : मेट्रो-2 (बी) मार्गावरील 2 स्थानकांचे नामकरण करण्याची मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली आहे. या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने चेंबूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात शेवाळे यांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. या निवेदनानुसार, देवनार स्थानकाचे नामकरण ‘देवनार – महालक्ष्मी मंदिर’ तर छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक – घाटला गाव, चेंबूर’ असे करण्यात यावे, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे.

राहुल शेवाळे यांच्या मागणीबाबत बोर्डमध्ये विषय मांडून आणि मुख्यमंत्री महोदयांना निवडून देऊन निर्णय घेऊ, असे सुतोवाच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लोकार्पण सोहळ्यातील भाषणात केले

मेट्रो-2 (बी) मार्गिकेवरील, देवनार स्थानकाच्या जवळ देवनार गाव आहे. इथल्या भूमिपुत्रांची ग्रामदेवता असलेल्या महालक्ष्मी मातेचे मंदिर या स्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहे. देवनार गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार या स्थानकाचे नामकरण, ‘देवनार- महालक्ष्मी मंदिर’ असे करावे, अशी मागणी माजी खासदार शेवाळे यांनी केली आहे. तसेच, पांजरपोळ इथल्या छत्रपती शिवाजी स्मारकाजवळील स्थानकाच्या शेजारीच घाटला गाव आहे. या ग्रामस्थांच्या मागणीनुसार, स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक- घाटला गाव,चेंबूर’ असे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

देवनार गाव आणि घाटला गाव या दोन्ही स्थानिक भूमिपुत्रांच्या गावांना मोठी परंपरा आहे. या गावांजवळून जाणाऱ्या मेट्रो-2 (बी) च्या स्थानकांचे नामकरणक करण्याची मागणी ग्रामस्थांनी माझ्याकडे केली होती. भूमिपुत्रांची ही मागणी माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मी लेखी निवेदन दिले. यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी अनुकूलता दाखवून भूमिपुत्रांच्या मागणीचा सन्मान केला आहे.
– राहुल रमेश शेवाळे, माजी खासदार

Scroll to Top