ताज्या बातम्या

मातीशी नाळ जोडणारे उद्योजक श्री हनुमंत रांजणे साहेब

सायगाव(अजित जगताप) : माणसाच्या मनामध्ये जिद्द व प्रेरणा आणि महत्वकांक्षा या तिन्ही गोष्टीचा संगम असेल तर निश्चितही डोंगर माथ्यावरही हिरवळ निर्माण करू शकतात. याची प्रचिती जावळी तालुक्यातील डोंगराळ भाग व महू धरणाचे धरणग्रस्त असलेल्या वहागांवचे सुपुत्र श्री हनुमंत रांजणे साहेब आणि त्यांचे कर्तबगार सुपुत्र श्री अभिजीत रांजणे साहेब, त्यांची पत्नी संचालिका सौ सोनाली रांजणे मॅडम यांनी दाखवून दिली आहे. मातीशी नाळ जोडणारे उद्योजक म्हणून श्री हनुमंत रांजणे साहेब यांनी करहर भागातील सुमारे अडीचशे तरुणांना महाराष्ट्रभर नोकरी व्यवसाय निमित्त संधी प्राप्त करून दिली आहे. सध्या साडेपाचशे तरुणांना रोजगार उपलब्ध केला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, नवी मुंबई शहर व महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात उन्नती आर्थिक परिवार प्रमुख म्हणून सध्या उन्नती फायनान्स, उत्कर्ष पतसंस्था, अर्थ फायनान्शिअल सर्विसेस, उत्कर्ष फिन अडवायझर आणि उन्नती फाउंडेशन अशा पाच संस्थांच्या माध्यमातून साडेसातशे कोटीपेक्षा अधिक व्यवसाय निर्मिती केलेली आहे. यासाठी त्यांची पत्नी सौ सोनाली हनुमंत रांजणे मॅडम , सुन सौ.आसावरी अभिजीत रांजणे, कन्या कुमारी अंकिता रांजणे यांचे खूप मोठे योगदान आहे. जावळी तालुक्यातील डोंगराळ व धरणग्रस्त वहागांव ते सानपाडा पंचतारांकित कार्यालय हा प्रवास म्हणजे थक्क करून टाकणार आहे. त्यांचे जन्मगाव असलेल्या जावळी तालुक्यातील धरणग्रस्त वहागांव येथील श्री भैरवनाथ मंदिर तसेच खंडाळा तालुक्यातील अजनूज येथील पुनर्वसित श्री भैरवनाथ मंदिराला सुद्धा त्यांनी भरीव सहकार्य केले आहे.
श्री हनुमंत बळवंत रांजणे म्हणजे नावातच हनुमंत सारखे उंच भरारी मारणारी व्यक्तिमत्व आहे.साधी राहणी, उच्च विचारसरणी म्हणतात तसे त्यांचे वागणे आहे. उद्योगाचं बाळकडू त्यांना त्यांचे वडील कै. बळवंत गणपत रांजणे व कै. लक्ष्मीबाई बळवंत रांजणे यांच्याकडून मिळाले. वडिल जुने साहित्य खरेदी – विक्रीचा व्यवसाय व आई पोटाची भूक भागवणारी खानावळ चालवत होती. त्यातूनच माणुसकी आणि व्यावसायिक मार्गदर्शन त्यांना लाभले. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मान्यताप्राप्त एन बी एफ ची ‘उन्नती फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
मुंबई नगरी मधील लोअर परळ या ठिकाणी वहागांव येथील ३०-४० मंडळी प्रत्येकी शंभर ते पाचशे रुपये जमा करुन एखाद्या गरजवंताला कर्ज द्यायचे व नंतर व्याजासहित ते परत घ्यायचे. असा विश्वासू फंड होता. त्यातील बारकावे पाहूनच त्यांना पुढे श्रमिक सहकारी बँकेत कर्ज विभागात रुजू झाले. सुरुवातीच्या काळामध्ये ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक व वहागावकर ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात. गेल्या १० वर्षात १ लाखाहून अधिक महिलांना कर्ज दिले असून एन.पी.ए. चे प्रमाण शून्य टक्के आहे.कोरोना काळातही कंपनीने अनेक महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करुन हातभार लावला.
श्री रांजणेसाहेब बी. कॉम पदवीधारक असून बैंकिंग क्षेत्रातील अनेक पदव्या त्यांनी घेतलेली आहे. अनेक वित्तीय संस्था, बँका त्यांच्या भागीदार आहेत. मुंबई नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक भागात उन्नती आर्थिक परिवाराचे जाळे विणले गेले आहे. अर्थसहाय्य करून अनेकांना हातभार लावला त्यापुढे कंपनी आता सोने तारण कर्ज, लघु प्रॉपर्टी कर्ज, व्यवसाय कर्ज, मेडिक्लेम पॉलिसी या क्षेत्रात कार्यरत आहे. अलीकडे रिझर्व बँक ऑफ इंडियाने कंपनीला पब्लिक लिमिटेड कंपनी करण्याचा परवाना दिला आहे. विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे उन्नती परिवार हे ब्रीदवाक्य ठरले आहे. या सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला अर्थसहाय्य, ग्रामीण भागातील सुख सुविधा निर्माण करण्यासाठी स्वखर्चाने देणगी व उपक्रम राबवले आहेत. सौ. सोनाली रांजणे यांचे ह भ प दत्तात्रय महाराज कळबे विद्यालय, दापवडी येथे प्राथमिक शिक्षण झाले. त्या शाळेला सुद्धा सभामंडप, आजोळ असलेल्या कावडी गावामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा यंत्रणा आणि प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या करहर या ठिकाणी भाविकांसाठी पत्राशेड उभारणीमुळे अनेक वारकऱ्यांना सावली मिळाली आहे.
त्यांचा चिरंजीव अभिजीत रांजणेसाहेब यांनी सुद्धा एम.बी.ए. शिक्षण पूर्ण करून आपले कौशल्य दाखवले आहे. श्री हनुमंत रांजणे साहेबांची कन्या परदेशामध्ये शिक्षण घेत आहे. श्री. रांजणे साहेब व्यक्ती नसून एक विचार बनले आहेत. नुकताच त्यांना धगधगती मुंबई साप्ताहिकाच्या वतीने उद्योजक पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कारापेक्षाही त्यांचे व्यक्तिमत्व खूप मोठे असल्याने आज त्यांच्या हात म्हणजे एक परीस झालेला आहे. ज्या ठिकाणी ते स्पर्श करतील त्या ठिकाणी निश्चितच सोने होणार असल्यामुळे बाजारपेठेत ही त्यांच्या शब्दाला किंमत आणि मानसन्मान आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये ६४ शाखेच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची ओळख झाली आहे. खऱ्या अर्थाने जावळीच्या सुपुत्राने अनेकांना सावली मिळवून दिल्याबद्दल त्यांना दि:१० एप्रिल रोजी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण भेट घेत आहेत. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…….
—– श्री.अजित जगताप, सायगाव तालुका जावळी जिल्हा सातारा. 9922241299/9156140491

————————————————-

फोटो श्री रांजणे साहेब यांच्या कार्याची ओळख देणारे फोटो..

Scroll to Top