ताज्या बातम्या

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहीम रेती बंदर समुद्र कीनार्यावर विशेष स्वच्छता मोहीम!


प्रतिनिधी : ५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जी/उत्तर विभागातील माहीम रेती बंदर या ठिकाणी युनायटेड वे ,कोस्टल केअर एनवायरो तसेच महानगरपालिका जी-उत्तर विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता मोहीम राबवून माहीम रेतीबंदर समुद्र किनारा वरील २ टन कचरा गोळा करुन समुद्र किनारा कचरा मुक्त केला.
या मोहिमेत युनायटेड वे चे स्वानंद गावडे,अजय गोगावले तसेच मनपाचे सुपरवाईझर रत्नकांत सावंत तसेच राजेश भावसार यांनी भाग घेऊन कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.
या मोहीमेत युनायटेड वे १५० कर्मचारी तसेच एनजीओ चे २० कर्मचारी सहभागी होऊन समुद्र किनारा स्वच्छ करण्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी जेसीबी,डंपर,तसेच बोबकेट,दाब यत्रांचा वापर करून जमा केलेला कचरा सेग्रीकेट करुन ७०० किलो प्लास्टिक वेगळे करण्यात आले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top