मुंबई (शांताराम गुडेकर ) : शिवसेना नेते,खासदार व ग्राहक संरक्षण कक्षचे अध्यक्ष मा.श्री.अनिलभाऊ देसाई यांच्या आदेशानुसार तसेच ग्राहक संरक्षण कक्षचे सचिव मा.श्री. निखिलजी सावंत व श्री. अशोकजी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर पश्चिम येथील अमृत नगर सर्कल परिसरातून बस क्रमांक ३८० पूर्वी अमृत नगर सर्कल ते ट्रॉम्बे या मार्गावर धावत होती. मात्र कोरोना काळातील लॉकडाऊन दरम्यान ही सेवा बंद करण्यात आली.कोरोना नंतर सदर बस सेवा ट्रॉम्बे ते घाटकोपर पूर्व स्टेशन या मर्यादित मार्गावर सुरू करण्यात आली आहे.
यामुळे अमृत नगर सर्कल परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, बस क्रमांक ३८० पुन्हा अमृत नगर सर्कलपर्यंत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा यांच्या वतीने आज निवेदन पत्र देण्यात आले.अमृत नगर येथून ही बस बंद केल्यामुळे जेष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला, शालेय विद्यार्थी, चेंबूर विभागात जाणारे कामगार यांची गैरसोय होत असून त्यांना आता अमृत नगर ते घाटकोपर ला बस किंवा रिक्षाने नाही तर चालत जावे लागते.घाटकोपर पश्चिम वरून पुन्हा रेल्वे ब्रिज क्रॉस करून घाटकोपर पूर्व जाऊन पुन्हा दुसऱ्या बसचा आधार घ्यायला लागतो. त्यामुळे वेळ, पैसे जास्त वाया जातात.
घाटकोपर बस डेपोचे निरीक्षक श्री.पी.एन. पांढरे, श्री.विकास विठ्ठल चौगुले व व्यवस्थापक श्री.बाळकृष्ण चौधरी तसेच देवनार बस डेपोचे बस कंट्रोलर श्री.कांतिलाल ठुंबरे आणि बस व्यवस्थापक श्री.राजेश मोहिते यांना निवेदन पत्रक सादर करण्यात आले.या वेळी ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.यामध्ये कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर, कक्ष उपसंघटक (१२३ /१२४ ),श्री.राजेंद्र पेडणेकर, कक्ष वार्ड संघटक (१२३),श्री.संतोष चांदे आणि कक्ष वार्ड संघटक (१२७) श्री.कल्पेश बुवा यांचा समावेश होता.




