प्रतिनिधी : आजपासून मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी वारे, विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
तर उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा तडाखा, ढगाळ हवामान वातावरण कायम राहील, अशी शक्यताही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर,तसेच अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.