ताज्या बातम्या

स्वच्छ भारत अभियानात संगम प्रतिष्ठानचे ‘चकाचक गोवा’ उपक्रमाद्वारे एक पाऊल पुढे…..

मुंबई : गेली १२ वर्षे सातत्याने मुंबई महानगरपालिकेसोबत वेस्ट मॅनेजमेंट क्षेत्रात सुका कचरा वर्गीकरण, कचरावेचकांच्या रोजगार व न्यायहक्कांसाठी कार्यरत असलेल्या संगम प्रतिष्ठानने पुन्हा एकदा पर्यावरण जनजागृतीत आपली वेगळी छाप पाडली आहे.
कोकाकोला बेव्हरेजेसच्या सहकार्याने दक्षिण भारतात पर्यावरण जनजागृतीचा संदेश देत पुढे सरसावलेल्या या संस्थेने दि. २० मार्च रोजी गोव्यातील कलिंगुट बीच येथे विशेष उपक्रम राबवला. स्थानिक पंचायत, गोव्यातील नागरिक आणि संगम प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांच्या सहभागातून पेट कलेक्शन ड्राइव्ह आणि स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पडले.
या उपक्रमात कोकाकोलाचे नॅशनल हेड तसेच पंचायत समितीचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेत सक्रिय सहभाग नोंदवला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी “चकाचक गोवा” या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामुळे जनजागृतीसोबतच उपस्थितांचे मनोरंजनही झाले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या सचिव ॲडव्होकेट कोमल तानाजी घाग, खजिनदार पृथा घाग, रंगनाथ नाडर आणि छायाचित्रकार ओमकार कोचरेकर यांनी मोलाचे योगदान दिले.
संगम प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असून, “स्वच्छ भारत” संकल्पना अधिक बळकट होत असल्याचे दिसून येत आहे.

Scroll to Top