धारावी : धारावी विधानसभा शाखा क्र. १८६ अंतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या शिव वाहतूक सेनेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी कामराज शाळा ते सायन रेल्वे स्टेशन या मार्गावर शेरिंग टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच रुग्णांना तातडीने उपचारासाठी पोहोचविण्याच्या दृष्टीने सायन रुग्णालयासाठी अत्यावश्यक टॅक्सी सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या टॅक्सी स्टॅंडच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. श्री. भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राज्य उपाध्यक्ष दर्शनबीर सिंग कोच्छर, राज्य सचिव शिवाजी मोरे, राज्य उपसचिव राहुल, धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, नगरसेविका अर्चना ताई शिंदे, शाखा समन्वयक संतोष पोटे, शाखा संघटक बाळा घाडीगावकर, युवासेना चिटणीस प्रसाद भानुदास बोबडे, युवासेना उप-समन्वयक निलेश भीमसेन धडके, शिव वाहतूक सेना उपाध्यक्ष (धारावी) सागर रामदास बोबडे, चिटणीस शहानवाज सिद्धिकी, शाखा अध्यक्ष (१८७) राजेंद्र विष्णू वाकळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन शाखा अध्यक्ष वैभव विलास पवार यांनी केले होते. उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने टॅक्सी चालक-मालक तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. या सेवेच्या माध्यमातून परिसरातील प्रवाशांना सुरक्षित, जलद व परवडणारी प्रवास सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.




