ताज्या बातम्या

राष्ट्रीय चर्मकार संघाचा शानदार रौप्य महोत्सवी सोहळा शनिवारी धारावीत संपन्न होणार

मुंबई : राष्ट्रीय चर्मकार संघाचा शानदार रौप्य महोत्सवी सोहळा येत्या शनिवारी १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वा.धारावीमधील पद्मभूषण मनोहर जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा रौप्य महोत्सवी सोहळा होणार आहे.
या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी गुरु रविदास महाराज,संत कक्कया महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,माता सावित्रीबाई फुले,माता रमाई आणि माता फातिमा शेख या संत राष्ट्र पुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव यावेळी होणार आहे.तसेच संत रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीचा शुभारंभही यावेळेस होणार असल्याचे राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगांवकर, महासचिव गणेश खिलारे यांनी सांगितले. आंबेडकरी विचारांचा अंगार फुलविणारे प्रसिध्द शाहीर संभाजी भगत यांच्या मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम यावेळेस होणार आहे.
*जीवन गौरव पुरस्कार*
या रौप्य महोत्सवी सोहळ्या निमित्त समाजासाठी उल्लेखनीय सेवा बजावल्या बद्दल श्रीमती कल्पना शिंदे,संतोष भोईर,अ‍ॅड नारायण गायकवाड कुंडलिक गवळी,सत्यवान बेलापूरकर,महादेव कृष्णा शिंदे,सिद्राम मारुती नारायणकर यांचा राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे अध्यक्ष बाबुराव माने यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून अभिनेते पुरोगामी वक्ते किरण माने,सिध्दार्थ महाविद्यालयाच्या पाली भाषा विभागाचे प्रा.विजय मोहिते,प्रजासत्ताक जनता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे,मुंबई हाय कोर्टचे वकिल अ‍ॅड सिध्दार्थ हत्तरकर,कक्कया समाज महासंघाचे मुंबई अध्यक्ष निवृत्ती सावळकर,राष्ट्रीय चर्मकार संघाचे नेते रामभाऊ कदम,परशुराम इंगोले,राष्ट्रीय चर्मकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत गवळी हे उपस्थित राहणार आहेत.याच बरोबर राष्ट्रीय चर्मकार संघाच्या महिला अध्यक्षा शारदा नवले अध्यक्ष विलास गोरेगांवकर,महासचिव गणेश खिलारे,सुरज भोईर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
*बाबुराव माने यांचा सत्कार*
गेल्या ३० वर्षाहून अधिक काळापासून चर्मकार समाजासाठी संघर्षमय योगदान दिल्याबद्दल माजी आमदार बाबुराव माने यांचा या रौप्य महोत्सवी सोहळ्यात राष्ट्रीय चर्मकार संघा तर्फे सत्कार करण्यात येणार आहे.
चर्मकार समाजाची अखंडता,अस्मिता,अस्तित्व आणि या समाजाच्या उज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली अराजकीय सामाजिक संघटना म्हणून राष्ट्रीय चर्मकार संघ ही एक लोकप्रिय संघटना आहे.या संघटनेने समाजातील भूमिहिनांना दादासाहेब गायकवाड योजनेखाली शासकीय जमिन मिळवून देणे,समाजातील स्रीयांवर झालेला अन्याय,अत्याचार प्रकरणातील महिलांना न्याय मिळवून देणे, संबंधित प्रकरणातील आरोपींना जेलची हवा खाण्यास लावणे, होतकरु गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावणे,मुंबई महानगर क्षेत्रातील राज्यातील गटई चर्मोद्योग कामगारांना स्टाॅल मिळवून देणे- या स्टाॅल संबंधितातील अडीअडचणी दूर करणे यासारखी असंख्य सामाजिक कामे या संघटनेने आपल्या कारकीर्दीत नेटाने मार्गी लावलेली आहेत.

Scroll to Top