ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

26 मार्चला थकीत बिलांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर शिक्षक भारतीचा आक्रोश मोर्चा

प्रतिनिधी : गेल्या तीन वर्षांपासून थकीत वेतनासाठी शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण निरीक्षक (उत्तर/ दक्षिण/ पश्चिम) कार्यालयात हेलपाटे मारावे लागल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही. माननीय उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही प्रशासकीय अनास्थेमुळे वेतन देयके रखडल्याने, ‘शिक्षक भारती’ संघटनेच्या वतीने येत्या 26 मार्च 2026 रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर ‘आक्रोश आंदोलन’ करण्याचा इशारा शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे दिला आहे.

राज्यातील अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गेल्या तीन वर्षांपासूनची वेतन देयके तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे प्रलंबित आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयाने विविध याचिकांमध्ये शिक्षकांच्या बाजूने निकाल देऊन वेतन अदा करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. शिक्षण संचालकांनी १३ जून २०२५ रोजी पत्र काढूनही विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने यावर कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.

शिक्षक भारती संघटनेने यापूर्वी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे थकीत बिलाबाबत वारंवार विचारणा करून निर्णय घेण्याची विनंती केली होती. परंतु कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही. परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.म्हणून आंदोलन कल्याण चा निर्णय घेतला आहे असे श्री सुभाष मोरे यांनी स्पष्ट केले.

Scroll to Top