ताज्या बातम्या

कराड तालुक्यात मतदाना पूर्वीच राजकीय राडा; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला भाजपाच्या कार्यकर्त्याकडून मारहाण

कराड(ज्ञानेश्वर शेवाळे) पाल जिल्हा परिषद गटातील भाजपा उमेदवाराच्या कार्यकर्त्याकडून प्रतिस्पर्धी गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण: महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला आता अवघे काही तास उरले असताना सातारा जिल्ह्यातील पाल जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार माधवराव काळभोर यांच्या भावाने प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असून सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बाबासाहेब चोरेकर यांचे नातू बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांनाही मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली असून सदर, प्रकरणी बाळासाहेब साळुंखे चोरेकर हे उंब्रज पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाले यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार देवराज व माजी सहकार मंत्र्यांचे पुतणे सागर पाटील हे देखील उंब्रज पोलीस ठाण्यात उपस्थित झाले होते, सदर घटनेबाबत उंब्रज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उंब्रज पोलीस करत आहेत. या घटनेमुळे कराड तालुक्यात एकच खळबळ झाली आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top