ताज्या बातम्या

के.के. शेलार यांना धगधगती मुंबईचा राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार जाहीर

मुंबई : यशस्वी उद्योजक आणि सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते श्रीकृष्ण काशिनाथ शेलार (के.के. शेलार) यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील योगदानासह उल्लेखनीय समाजसेवेबद्दल उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत स्वतःचा व्यवसाय उभारणाऱ्या के.के. शेलार यांनी उद्योग आणि समाजसेवा यांचा समतोल साधत सातत्यपूर्ण कार्य केले आहे.
समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोर-गरीब कुटुंबांना आर्थिक मदत केली आहे. कोरोना महामारीच्या काळात अन्नधान्य, औषधे व आर्थिक सहाय्य देत अनेक गरजू नागरिकांना त्यांनी मदतीचा हात दिला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, अबालवृद्ध व गरजू घटकांना सहकार्य, तसेच आरोग्यविषयक मदत उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
ग्रामीण विकास, धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांनी मोलाचे योगदान दिले असून, त्यांच्या उद्योग व समाजसेवेच्या कार्याची दखल घेत धगधगती मुंबई वृत्तपत्राकडून उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top