ताज्या बातम्या

महाबळेश्वर तालुका संवाद मेळाव्यात शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

नवी मुंबई(नितीन गायकवाड) : महाबळेश्वर तालुका संवाद मेळाव्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद उमेदवार अजित संकपाळ, तळदेव गणाचे उमेदवार संजय शेलार तसेच वाडा कुंभरोशी गणाचे उमेदवार संजय मोरे यांच्या उपस्थितीत कोपरखैरणे येथील कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला.
रामेघर गावचे विठ्ठल लक्ष्मण कदम (दादा), सोमण पांडुरंग कदम, आनंद लक्ष्मण कदम, एकनाथ दगडू कदम तसेच सरपंच सुनील दगडू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आई तुळजाभवानी उत्कृष्ट मंडळाचे अध्यक्ष दीपक हरिबा कदम यांच्यासह शंकर भिवराम कदम, संजय लक्ष्मण कदम, सुनील विठ्ठल कदम, बजरंग लक्ष्मण कदम, राजेश महादेव कदम, गणेश तानाजी कदम, नारायण लक्ष्मण कदम, हरीश मारुती कदम आदी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
हा पक्षप्रवेश नेरूळ येथील नगरसेवक चंद्रकांतजी अगोंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख (सातारा) विशाल संकपाळ तसेच तालुका प्रमुख गणेश उत्तेकर यांच्या हस्ते पार पडला. या पक्षप्रवेशामुळे महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून आले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top