ताज्या बातम्या

निहाल रिसॉर्ट येथे ८ वा वर्धापन दिन उत्साहात; श्री. सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन

तापोळा(नितीन गायकवाड) : आहिरे–वानवली येथील निहाल रिसॉर्ट येथे ८ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री. सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमास लालबाग–परळचे माजी आमदार श्री. दगडू दादा संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील व्यावसायिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असून, सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन उद्योजक अशोक दादा संकपाळ, युवासेना जिल्हा प्रमुख विशाल दादा संकपाळ तसेच प्रदीप दादा संकपाळ यांनी केले आहे.
धार्मिक वातावरणात पार पडणाऱ्या या कार्यक्रमामुळे सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन होणार असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top