ताज्या बातम्या

केतकी बाल साहित्य निर्मिती पुरस्कार २०२६ अंतर्गत निबंध स्पर्धेत शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रतिनिधी : केतकी प्रकाशन प्रा. लि. प्रस्तुत केतकी बाल साहित्य निर्मिती पुरस्कार २०२६ अंतर्गत वाचन संस्कृती वाढविण्याचे अभियान हा उपक्रम लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे व त्यांचा बौद्धिक विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. हा उपक्रम केतकी प्रकाशनचे सर्वेसर्वा चंद्रकांत जाधव यांची पहिली संकल्पना असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा एक भाग म्हणून मुंबई व महानगर परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ५२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रकाशनाच्या वतीने या उपक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना केतकी प्रकाशन प्रा. लि. यांच्या वतीने पारितोषिके व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेत यशस्वी ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
वाशी इंग्लिश स्कूल, वाशी
आदित्य विश्वनाथ निलामवार – प्रथम पारितोषिक
काया केतन हुंबर – द्वितीय पारितोषिक
अगाध अंकुश माने – द्वितीय पारितोषिक
दिशा राजेश भानुशाली – तृतीय पारितोषिक
साईनाथ इंग्लिश स्कूल, वाशी
आशी यादव – प्रथम पारितोषिक
शास्त्री विद्यालय
शिवांगी धर्मेंद्र साहानी – प्रथम पारितोषिक
या यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन व सृजनशीलतेला निश्चितच चालना मिळत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top