ताज्या बातम्या

महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टतर्फे वार्षिक स्नेहसंमेलन उडान-2026 चे धारावीत आयोजन….

प्रतिनिधी : शालेय व महावि‌द्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. त्यांच्यातील सुप्तकला सर्वांच्या समोर येऊन त्यांच्यातील दडलेला चांगला कलाकार बाहेर यावा हे यामागील उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टने शालेय व महावि‌द्यालयीन वि‌द्यार्थ्यांच्या वार्षीक स्नेहसंमेलनाचे म्हणजेच उडान-२०२६ चे आयोजन शनिवार, दि. ३१ जनिवारी, २०२६ रोजी दु.३ ते ६ या वेळात संस्थेच्या पी.एम.जी. कॉलनी, धारावी येथील भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात केले आहे.
या वार्षिक स्नेहसंमेलनाला इन्कम टॅक्स अधिकारी राम कृष्ण झा, दै. दोयहर का सामनाचे उपसंपादक संदिय पांडे, स्थानिक नगरसेविका आशा काळे, धारावी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू बिडकर, WPP या स्वयंसेवी संस्थेच्या रमा मॅडम, संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार बाबुराव माने या प्रमुख पाहुण्यांसह संस्थेचे सर्व पदाधिकारी, विविध विभागाच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग तसेच बहुसंख्येने पालकवर्ग यावेळी उपस्थित राहणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शालेय व महावि‌द्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक व आजच्या ज्वलंत विषयावर व देशभक्तीवर विविध कार्यक्रम अनेक दिवस परिश्रम करून वि‌द्याथ्यांनी बसविले असून अश्या कार्यक्रमाचा रंगारंग कार्यक्रम यावेळी पार पडणार असून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे विश्वस्त प्रमोद माने व स्वाती माने- होलमुखे यांनी केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top