सातारा (अजित जगताप) : शुक्रवार दिनांक ३१ मे म्हणजे महिना अखेर पण, याच दिवशी सातारा जिल्ह्यातील केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय- निम शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस म्हणून चांगलाच गाजला. पूर्वी शाळा प्रवेशासाठी दिनांक एक जून ही जन्मतारीख म्हणजे वाढदिवस असे समीकरण झाले होते. आज या समीकरणाची शेवटची पिढी म्हणून काहींचा सेवानिवृत्ती निमित्त सातारा जिल्ह्यात सुमारे अडीचशे सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचाऱ्यांचा विविध कार्यालयात सत्कार करण्यात आला. काँग्रेसच्या राजवटीमध्ये १९८० साली तात्कालीन मुख्यमंत्री शंकर राव चव्हाण यांनी महाराष्ट्रात प्रथमच झिरो बजेट आणल्यामुळे शासकीय सेवेत कपात करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा शासकीय सेवेत भरती झाली. आता त्यावेळी भरती झालेली पिढी आता सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहे. त्यामुळे ३१ मे रोजी सातारा जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयात सेवानिवृत्तीचा सोहळा पाहण्यास मिळाला.
सातारा जिल्ह्याचा विचार केला तर शासकीय- निमशासकीय व अनुदानित अशा विविध संस्था आहेत .या संस्थेमध्ये ३१ मे या दिवशी ज्यांची सेवा निवृत्ती झाली आहे. अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी सापत्नीक सत्कार करून त्यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच दीर्घ आयुष्य लाभो. अशी शुभकामना केली आहे.
यामध्ये पोलीस , नगर पालिका,नगरपंचायत,पंचायत समिती सातारा जिल्हा परिषद, पाटबंधारे ,आरोग्य, शिक्षण, महसूल, विमा तसेच विविध केंद्र व राज्य सरकारच्या अनेक कार्यालयात आज सकाळपासूनच सेवानिवृत्ती निमित्त सोहळा व त्यानिमित्त स्नेह भोजन असे भरगच्च कार्यक्रम झाले.
सातारा जिल्ह्यात अडीचशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
RELATED ARTICLES