Monday, December 16, 2024
घरमहाराष्ट्र25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज


ठाणे : 25 ठाणे लोकसभा निवडणुका 20 मे 2024 रोजी पार पडल्या असून दिनांक 04 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया 8.00 वाजल्यापासून न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे (प) येथे होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची ‍ माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी दिली.
मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण शिबीर नुकतेच पार पडले असून मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांची रंगीत तालीम दि. 3 जून 2024 रोजी मतमोजणीस्थळी सकाळी 11.00 वाजता होणार आहे. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 या प्रमाणे एकूण 84 टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 1 सुपरवायझर, 2 मतमोजणी सहाय्यक व 1 सूक्ष्म निरीक्षक (Microbserver)असणार आहेत. तर प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी सुपरवायझर, 1 पर्यवेक्षक व 1 मतमोजणी सहायक, 1 शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच स्ट्राँगरुममधून ईव्हीएम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार असून यासाठीही स्वतंत्र 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 33 फेऱ्या, 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 34 फेऱ्या, 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 24 फेऱ्या, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 26 फेऱ्या, 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 31 फेऱ्या, 151 बेलापूर मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण 28 फेऱ्या होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी दिली.
25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण एक हजार अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यातआली आहे. तर एकूण 650 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या संपूर्ण बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे. ज्याप्रमाणे मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली त्याचप्रमाणे मतमोजणी प्रक्रियाही सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments