ताज्या बातम्या

गिरनार नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा २५ वे रौप्यमहोत्सवी वर्ष उत्सवात साजरा

मुंबई (मोहन कदम/शांताराम गुडेकर) : गिरनार नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा २५ वे रौप्यमहोत्सवी वर्ष उत्सवात साजरा करण्यात आला.गिरनार उत्सव समितीच्या माध्यमातून श्री सत्यनारायण महापूजा यशस्वीरित्या पार पडली.रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण गिरनार परिवारातील सर्व सदस्यांनी घेतलेली मेहनत,सहभाग, योगदान खरंच वाखाणण्यासारखा होता.
यानिमित्ताने गिरनार नागरी निवारा कार्यकारी मंडळाच्या वतीने गिरनार उत्सव समिती,गिरनार महिला मंडळ,गिरनार कला मंचाचे सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी, सदस्य आणि स्वयंसेवकांचे खूप खूप आभार,कौतुक आणि शुभेच्छा देण्यात आल्या.भविष्यात असेच उत्कृष्ट कार्यक्रमांच्या आयोजनाची अपेक्षा यानिमित्ताने गिरनार नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था, कार्यकारिणी मंडळच्यावतीने व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रममध्ये नवग्रह पूजा विधी,सत्यनारायण पूजा विविध क्रीडा स्पर्धा,पाककला स्पर्धा,जी.पी.एल क्रिकेट टूर्नामेंट,होम मिनीस्टरसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम,रेकॉर्ड डान्स,नाटक असे कार्यक्रम पार पडले.गिरनार नागरी निवारा सह.गृहनिर्माण संस्था (मर्या.) इमारत क्र. ५५, नागरी निवारा परिषद-२ दिंडोशी, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०० ०६५ येथे हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला.इमारत कार्यकारणी
उत्सव समिती कार्यकारणी श्री.लक्ष्मण ग. जाधव अध्यक्ष),श्री.सुशिलकुमार दे. शिंदे (सचिव,श्री.कैलाश स. गावडे (खजिनदार),श्रीमती सुजाता सु. कांबरे,श्री.अरविंद ल.जाधव (सचिव),श्री.वैभव दा. कदम( खजिनदार),गिरनार महिला मंडळ व सर्व रहिवाशी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top