ताज्या बातम्या

नवी मुंबई महापालिका निवडणूक 2025-26 : उद्या 15 जानेवारीला मतदान, प्रशासन सज्ज – आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता बुधवार, दि. 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका पूर्णतः सज्ज असून महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्येक टप्प्यावर बारकाईने आढावा घेतला आहे.
निवडणुकीच्या आदल्या दिवशी मंगळवार, 14 जानेवारी रोजी आठही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमार्फत मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक निवडणूक साहित्याचे वितरण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. सर्व पथके आपापल्या मतदान केंद्रांवर वेळेत पोहोचली असून मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे.
महापालिका आयुक्तांनी नवी मुंबईतील प्रत्येक पात्र मतदाराने आपला घटनेने दिलेला मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.
निवडणूकविषयक महत्त्वाची माहिती (संक्षेप)
एकूण मतदारसंख्या: 9,48,460
पुरुष: 5,16,267 | महिला: 4,32,040 | इतर: 153
एकूण प्रभाग: 28
प्रभाग 1 ते 27: 4 सदस्यीय
प्रभाग 28: 3 सदस्यीय
उमेदवार: 28 प्रभागांत एकूण 500 उमेदवार
मतदान केंद्रे:
मतदान केंद्र ठिकाणे: 191
एकूण मतदान केंद्रे: 1148
तात्पुरत्या मंडपातील केंद्रे: 180
सुविधा: बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय पथक, इमर्जन्सी मेडिसीन किट
व्हीलचेअर: 345 | मेडिकल किट: 200
मतदार सहाय्य:
प्रत्येक केंद्राबाहेर Voter Assistant Booth (BLO उपस्थित)
250+ स्वयंसेवक कार्यरत
दिव्यांग, वयोवृद्ध, गरोदर महिलांना प्राधान्य
तान्ह्या बाळांसाठी आशा स्वयंसेविकांची नियुक्ती
सुरक्षा व शिस्त:
मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास मनाई; बाहेर मोबाइल लॉकर पाऊच
1250 CCTV कॅमेऱ्यांद्वारे वेबकास्टिंग
200 मीटर वाहनमुक्त सीमा
कर्मचारी व्यवस्था:
6890 मतदान कर्मचारी (10% राखीव)
दोन प्रशिक्षण पूर्ण
प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त
ईव्हीएम:
1579 कंट्रोल युनिट, 3159 बॅलेट युनिट
सर्व तपासणी व सीलिंग राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष
विशेष मतदान केंद्रे:
प्रत्येक विभागात सखी (पिंक) व ग्रीन बूथ
मतमोजणी:
दि. 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून
आठ विभागांत आठ ठिकाणी
आचारसंहिता अंमलबजावणी:
24 तास कार्यरत – 9 SST, 8 FST, 16 VST पथके
दिव्यांग व वयोवृद्धांसाठी वाहतूक सुविधा – विभागनिहाय संपर्क:
बेलापूर: 9004357721 | नेरुळ: 9004347995 | वाशी: 8169484236
तुर्भे: 9892746228 | कोपरखैरणे: 9768068749 | घणसोली: 9004796650
ऐरोली: 9967108740 | दिघा: 8108246729
न.मुं.म.पा. मुख्यालय: 022-27567412
ओळखपत्र:
मतदानासाठी EPIC (मतदार ओळखपत्र) आवश्यक
नसल्यास, आयोगाने मान्य केलेल्या 12 ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ग्राह्य
महानगरपालिकेने मतदान व मतमोजणीसाठी सर्वांगीण तयारी पूर्ण केली असून प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने मतदान करून संविधानाचा सन्मान करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top