ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

महाबळेश्वर तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची मोठी घोषणा; संजय भालेराव व सिद्धार्थ यादव यांना उमेदवारी जाहीर, राजकीय वातावरण तापले

तापोळा(नितीन गायकवाड) : महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर होताच महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. थंडीच्या वातावरणातही निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे मतदारांमध्ये उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे.
महाबळेश्वर तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भिमनगर गावचे माजी सरपंच आयु. संजय भालेराव आणि वाडा–कुंभरोशी गणातून आयु. सिद्धार्थ यादव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष उत्तम शेठ भालेराव यांनी दिली.
महाबळेश्वर तालुक्यात गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आहे. मात्र, या वेळेस निर्णायक ठरणारा बौद्ध समाज स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेली सुमारे ४० वर्षे सत्ताधारी पक्षासोबत राहूनही समाजाला अपेक्षित न्याय व सत्तेत सहभाग मिळाला नाही, या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे भालेराव यांनी सांगितले.
राष्ट्रवादी पक्षासोबत कामाचा अनुभव असलेले संजय भालेराव पंचायत समितीची निवडणूक लढवत असून, त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील व्यापक सामाजिक व राजकीय संपर्काचा त्यांना निश्चित फायदा होईल, असा विश्वास समाज बांधवांनी व्यक्त केला आहे.
त्याचप्रमाणे, सत्ताधारी पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वाडा–कुंभरोशी गणातून सिद्धार्थ यादव यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दुधगाव येथील यादव कुटुंबाचे पंचक्रोशीत असलेले सामाजिक कार्य लक्षात घेता त्यांच्या विजयाचीही दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या दोन्ही उमेदवारांना भिमक्रांती युवक संघटना, महाबळेश्वर यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच समाजाच्या वतीने आयु. एन. डी. भालेराव, नितीन गायकवाड, विजय सपकाळ, एकनाथ भालेराव, अभिजात भालेराव, प्रकाश सपकाळ, संतोष भालेराव, रवींद्र भालेराव, गोविंद गाडगे, आनंद खरात, सुनील तांबे, आनंद सपकाळ, धोंडीबा पवार, मारुती कदम, शशी यादव, सखाराम कदम, सिद्धार्थ गायकवाड आदी मान्यवरांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
या उमेदवारीमुळे सत्ताधारी पक्षाला किती मोठा फटका बसेल, हे येणारा काळच ठरवेल, असा विश्वास संजय भालेराव व सिद्धार्थ यादव यांनी समाज बांधवांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.

Scroll to Top