ताज्या बातम्या

डाॅ.संदीप डाकवे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. आचार्य बाळशस्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.ऑप.क्रे. सोसायटी व शिवसमर्थ परिवार यांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पत्रकार डॉ.संदीप डाकवे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पुरस्कार देवून गौरवण्यात आले. आकर्षक सन्मानपत्र, दिवाळी अंक, नवीन वर्षाची दिनदर्शिका, शाल आणि मिठाई देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड. जनार्दन बोत्रे, सीईओ हेमंत तुपे, व्यवस्थापक नितीन पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारिता व चित्रकलेच्या माध्यमातून डॉ.संदीप डाकवे यांनी ग्रामीण भागामध्ये भरीव योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे योगदान समाजासाठी दिशादर्शक आहे. शासनाच्या विविध योजनांवर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे. ग्रामीण भागातील समस्या, अडचणी वृत्तपत्रातून उत्कृष्ट व प्रभावीपणे मांडल्या आहेत. असे मत ॲड. जनार्दन बोत्रे यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिनादिवशी मिळालेल्या पुरस्कारामुळे पत्रकारितेत काम करण्याची नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल असे मत पत्रकार डॉ.संदीप डाकवे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
काही दिवसापूर्वी संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाचा पत्रकारितेतील सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कारातील काही रक्कम त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल काळगाव च्या डागडुजीसाठी दिली होती. यातून संदीप डाकवे यांचा संवेदनशीलपणा दिसून येतो.
विशेष म्हणजे संदीप डाकवे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जंयतीनिमित्त प्रतिवर्षी अनोखी आदरांजली वाहतात. यावर्षी त्यांनी जांभेकर यांचे पिंपळपानावर चित्र रेखाटून त्यांना अभिवादन केले आहे. यापूर्वी त्यांनी स्क्रिबलिंग, शब्द व लेखणी, पोस्टर, रांगोळी, ठिपके, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिनींची नावे, पेपर कटींग आर्ट, टूथ ब्रश स्प्रे इ. माध्यमातून दर्पणकारांची सुंदर चित्रे साकारली आहेत.
सन 2026 मध्ये त्यांना मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाकडून पत्रकारितेसाठी 6 वेळा गौरवले आहे. या सन्मानामुळे डॉ.संदीप डाकवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top