कराड :

कराड दक्षिणचे कार्यसम्राट आमदार माननीय डॉ. अतुल बाबा भोसले यांच्या माध्यमातून कराड दक्षिणच्या शेवटच्या टोकावरील शेवाळेवाडी (येवती) गावातील श्री भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराअंतर्गत मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामाचा शुभारंभ मंगळवार, दि. ०६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भूमिपूजन करून करण्यात आला.
अगदी लहान वाड्या-तोड्यांसाठीही भरघोस निधी उपलब्ध करून देत शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचविण्याचे काम आमदार डॉ. अतुल बाबा भोसले सातत्याने करत आहेत. अशा दमदार आमदारांचे नेतृत्व कराड दक्षिणला लाभले, हे आमचे भाग्य असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या विकासासाठी आमदार साहेबांचे आभार मानावे तेवढे थोडेच असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या प्रसंगी श्री भैरवनाथ मंदिर परिसरात गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल श्री भैरवनाथ मंदिर सुशोभीकरण समिती, शेवाळेवाडी (वाडाहुडा) यांच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. पुढील काळातही अशीच एकी राखून सार्वजनिक हिताची विकासकामे मार्गी लागावीत, अशी प्रार्थना श्री भैरवनाथ चरणी करण्यात आली.




