ताज्या बातम्या

एकता कल्चरल अकदामी’ चा शनिवारी ‘एकता महोत्सव; ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते यांना ‘जीवन गौरव’

मुंबई / ठाणे : ‘एकता कल्चरल अकादमी’ या साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रात गेली ३७ वर्षे काम करणाऱ्या संस्थेतर्फे प्रत्येक वर्षी काव्यवाचन, काव्यलेखन, एकेरी नृत्य, समूह नृत्य, चित्रकला अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. त्याच सोबत साहित्य, कला, पत्रकारिता आणि समाजसेवा या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या महनीय व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
या वर्षीही ‘एकता महोत्सव’ शनिवार दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या अ. ना. भालेराव सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
दैनिक ‘नवशक्ती’ चे माजी संपादक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते प्रख्यात ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते यांना जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
समारंभात भगवान निळे यांच्या ‘एका कवीच्या दुःखाचे भाषांतर’ या काव्य नाट्य पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.
‘एकता’ चे अध्यक्ष प्रकाश ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या महोत्सवात कवी, पत्रकार भगवान निळे, कवी अजय कांडर, लोकशाहीर संभाजी भगत, नृत्य दिग्दर्शक सदनंद राणे, बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य रमेश यादव, चित्रकार प्रदीप म्हापसेकर, चित्रकार उज्जय आंबेकर आणि समाजसेवक गंगाधर म्हात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदर महोत्सवाचे सूत्रसंचालन कवयित्री कीर्ती पाटसकर व अभिनेते अनिल सुतार करणार आहेत, अशी माहिती संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांनी एका पत्रकाद्वारे दिली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top