ताज्या बातम्या

मुंबई महापालिका निवडणूक: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नवे शहरी गणित

विशेष lekh : मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राहिलेली नाही; ती राज्याच्या सत्तासमीकरणाची नांदी मानली जाते. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी आखलेले राजकीय गणित लक्षवेधी ठरत आहे. ही लढत भावनांपेक्षा आकडे, प्रभाग रचना आणि मतदारांच्या बदलत्या प्राधान्यांवर आधारित असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

*प्रभाग पातळीवर हिंदुत्वाचा वापर*

महापालिका निवडणुकीत मोठ्या घोषणा नव्हे, तर स्थानिक मुद्द्यांशी जोडलेली भूमिका निर्णायक ठरते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा प्रभागस्तरावर *“सुरक्षितता, सांस्कृतिक ओळख आणि सार्वजनिक उत्सवांचे व्यवस्थापन”* या चौकटीत आणला आहे. यामुळे हिंदुत्व हे केवळ वैचारिक न राहता नागरी प्रशासनाशी जोडलेले मुद्दे बनतात—जे शहरी मतदारासाठी महत्त्वाचे आहेत.

*मराठी मतदार: अजूनही कणा, पण एकमेव आधार नाही*

मुंबई महापालिकेच्या अनेक प्रभागांमध्ये मराठी मतदार अजूनही निर्णायक भूमिका बजावतो. मात्र, त्यांचे प्रश्न बदलले आहेत. पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, झोपडपट्टी पुनर्वसन, स्थानिक रोजगार—या मुद्द्यांवर ठोस आश्वासन देणाऱ्या उमेदवारांकडे मराठी मतदार झुकताना दिसतो. *एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मराठी अस्मितेला थेट नागरी सोयी-सुविधांशी जोडून मांडलेय, हे या निवडणुकीतील महत्त्वाचे धोरण मानले जाते.*

*मुंबईतील वाढलेले बहुभाषिक अमराठी मतदार व महापालिकेच्या सत्तेच्या-चाव्यांचे गणित*

मुंबई महापालिकेतील अनेक प्रभागांमध्ये अमराठी मतदारांचे प्रमाण निर्णायक आहे. उत्तर भारतीय, गुजराती आणि दक्षिण भारतीय समाजघटक प्रामुख्याने व्यापारी, मध्यमवर्गीय आणि स्थलांतरित कामगार म्हणून शहराच्या कारभाराशी जोडलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या मतदारांकडे *“मुंबईकर”* या ओळखीने पाहण्याची भूमिका घेतल्यामुळे महापालिका निवडणुकीत नवे पर्याय खुले झाले आहेत.

*उमेदवार निवड आणि स्थानिक समस्या-विषयांची पकड*

महापालिका निवडणुकीत पक्षचिन्हाइतकीच उमेदवाराची स्थानिक पकड महत्त्वाची ठरते. शिवसेनेचा भर हा स्थानिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि नागरी प्रश्नांशी थेट संबंधित चेहऱ्यांवर असल्याचे दिसते. हे धोरण शिवसेनेसाठी पोषक व विरोधकांवर मात करणारे ठरू शकते, कारण प्रभागस्तरावर काम केलेला उमेदवार शेवटच्या टप्प्यात निर्णायक ठरतो.

*मुंबई महानगरपालिकेची लढत ‘भावना विरुद्ध प्रशासन’*

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक ही केवळ भावनिक व केवळ अव्यवहारी वैचारिक विषयांची लढाई नसून प्रशासन, विकास आणि प्रभागीय मतदारांच्या संख्यागणितांच्या कसोटीवर उतरणारी आहे. *एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हिंदुत्व, मराठी मतदार आणि अमराठी लोकसंख्येचा समतोल साधत महापालिकेसाठी व्यावहारिक राजकीय रणनीती आखल्याचे चित्र दिसते.* ही रणनीती प्रत्यक्ष मतदानात तीव्र स्वरूपात प्रभावी ठरल्यास, मुंबईच्या सत्तेची दिशा शिवसेनेसाठी भविष्यात सक्षमपणे अधोरेखित ठरण्याची दाट शक्यता आहे.

🖊️
– दिनेश शिंदे
मिडिया समन्वयक
शिवसेना पक्ष

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top