पनवेल(अमोल पाटील) : पनवेल महानगरपालिकेची रणधुमाळी चर्चेत आली असून महायुतीने महाविकास आघाडीला प्रतिउत्तर देत शेकापच्या ७८ पैकी ३३ जागांवर लढत होणार आहे. उर्वरित ४५ जागा मित्र पक्षांना देण्याचा निर्णय शेकापणे घेतला असून “एकीचे बळ” हे सूत्र पुढे केले असले तरी या त्यागाची झळ शेकापच्या कार्यकर्त्यांचा बसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
पनवेल महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होत असून अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी रात्री जागा वाटपाचे सूत्र जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीने सोमवारी रात्री उशिरा जागावाटप झाल्या. शेकापला ३३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १९ काँग्रेसला १२आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) ७ उमेदवार देण्याचे स्पष्ट केले. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दोन तर समाजवादी पक्ष ओपन वंचित बहु प्रत्येकी एक जागा देण्यात आल्याचे सांगितले आहे.




