सातारा(अजित जगताप) : पांढरीशुभ्र कपडे, टायटन चे किमती घड्याळ,बोटात मौल्यवान अंगठी, खिशाला सोनेरी महागडा पेन,कायम पॉलिश केलेले बूट..’होंडा’ची स्वच्छ चारचाकी गाडी अन चेहऱ्यावर नैसर्गिक श्रीमंती…जो संपर्कात येईल त्याला आपलंसं करण्याचा प्रेमळ स्वभाव.. ते येतात..ते पाहतात अन ते जिंकतात अशा अविर्भावात राहणारे रुबाबदार अन ‘स्टेनलेस’ व्यक्तिमत्व म्हणजे अरविंद काका कुदळे..आज त्यांचा वाढदिवस, त्यानिमित्त
व्याजवाडी…!बावधन च्या बारा वाडयांपैकी एक असणारे,वैराटगडाच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं पण टुमदार गाव..!या छोट्या गावाने अनेक मोठी माणसं घडवली.अरविंद काकांची जडणघडणच उद्योगपती घराण्यात झाली.वडील गणपतराव कुदळे यांनी मुंबईनध्ये स्टील बफिंग चा कारखाना सुरू करून आपल्या पारंपारिक शेती व्यवसायातील प्रयोगशीलता स्टील कारखान्यात वापरली.गावाकडचा माणूस प्रामाणिक असतो हे बिरुद गणपत शेठ यांच्या कामी आलं.त्यांचा जम या व्यवसायात बसला.यादवराव,महादेवराव,हणमंतराव,या तीन बंधूंनंतर आणि बहिणी नंतर अरविंदकाकांचा जन्म झाला.
मुंबईमध्ये वडिलांनी जम बसविल्यानंतर अरविंद काकांचा जन्म झाल्याने साहजिकच काकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिल गेलं.प्राथमिक शिक्षण व्याजवाडी घेतल्यानंतर काकांनी पुण्यातील गरवारे कॉलेज मधून पदवी घेतली.
काकांचे दोन मोठे बंधू वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असताना यादवराव (भाऊ) यांनी वडिलांना स्टील व्यवसायात मदत करत होते.काकांनी ‘स्टेनलेस स्टील’ या व्यवसायतील ‘स्टेनलेस’ या शब्दाकडे विशेष लक्ष देत काकांनीही याच व्यवसायात उडी घेतली.अरविंद काका आणि यादवराव भाऊंनी हा व्यवसाय आणखी वाढविला.शाखा विस्तार केला.आपल्या गावाकडची माणसं मुंबईत आणली त्यांना उभं केलं.पारंपरिक स्टील बफिंग अन पॉलिशिंग बरोबरच काकांनी विविध आकार आणि डिझाईनचे स्टील पिंप बादलीचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली.काकांचा हा प्रयोग मुंबईकरांनी डोक्यावर घेतला.कुदळे स्टील मध्ये बनविलेली उत्पादने पूर्ण महाराष्ट्रात दिसू लागली.मागणी वाढत गेली.कारखाना बहरत गेला, उत्पन्न वाढले व्यवसाय नावारूपास आला.अरविंद काका अरविंदराव म्हणून नव्हे तर अरविंद शेठ म्हणून सुपरिचित झाले.
काकांनी उद्योगात उत्तुंग भरारी घेतल्यानंतरही काकांचे पाय कायम जमिनीवर राहिले.त्यांनी गावच्या मातीची नाळ कधीही तुटू दिली नाही.शिवाजीराव पिसाळ यांची त्यांच्याशी असलेली मैत्री गेली ६०-७० वर्ष अबाधित आहे.गावाकडची अनेक सामान्य माणस काकांनी आपल्या चांगल्या काळात बरोबर घेतली आणि त्यांना मुंबईत नोकरी व्यवसायात उभे केले.त्यांच्यातील समाजसेवक कोणत्याही अपेक्षेविना कायम धडपडत राहिला.काम करत राहिला.याच समाजकार्याच्या माध्यमातून काकांची स्व.लक्ष्मणराव पाटील तात्या यांच्यांशी संबंध आला.या दोघांचे सूर एवढे जुळले की काका तात्यांचे कार्यकर्ते नव्हे तर मित्रच झाले.तात्या स्वभावाने खूप मिश्कील होते.काकांना ते नेहमीच उद्योजक अरविंद शेठ म्हणून हाक मारायचे.या मैत्रीमुळे काका नकळत समाजकारणात आणखी सक्रिय होत गेले.
त्यांनी वाई तालुका ओबीसी संघटनेचे काम हाती घेतले.विस्कटलेली संघटना परत एकत्र आणली.सध्या ते वाई तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.व्याजवाडी विकास सेवा सोसायटीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले.सुनबाई स्वाती कुदळे यांना व्याजवाडीचे सरपंच करण्यासाठी काकांनी गावातील दोन गट एकत्र केले.गावात ऐक्य वाढविले.
माजी नगराध्यक्ष केबी जमदाडे बापू यांची पुतणी शोभा यांच्या माध्यमातून काका वाईचे जावई आहेत.त्यांची एक मुलगी व्यावसायिक असून मुलगा परदेशात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे.गणपतराव कुदळे यांचं मोठं कुटुंब आजही आपल्या एकत्र कुटुंबपद्धतीसाठी एकोप्यासाठी प्रसिद्ध आहे.व्यवसायाचे स्वरूप बदललं असलं तरी व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत आहेत.कुदळे यांची तिसरी पिढी पुणे मुंबईबरोबरच परदेशात आपल्या कुटुंबाचा नावलौकिक वाढवित आहेत.
अरविंद काका,आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात स्वच्छ आचार,विचार अन आपलं स्पटीकासारखं पारदर्शी व्यक्तिमत्व आणखी बहरवत आहेत.जुन्याबरोबरच नव्या सहकाऱ्यांना मैत्रीच्या धाग्यात गुंफत आहेत.समाधानी,तृप्त आनंदी स्वभावामुळे वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करतानाही काका चिरतरुण आहेत.आपल्याला तृप्त भविष्यकाळ आणि उत्तमोत्तम आरोग्य लाभो एवढीच बाळसिध्दनाथ चरणी प्रार्थना आपल्याला लक्ष लक्ष शुभेच्छा!
संपर्क अरविंदकाका कुदळे-९८५०९३३८१९
शब्दांकन सचिन ननावरे ९८२३९८५२५३




