कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचा औपचारिक शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीस चालना देणे आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
परंपरेनुसार मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी तालुक्यातील विविध भागांतील प्रयोगशील शेतकरी, कृषीप्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदर्शनाच्या माध्यमातून शेती, उद्योग आणि पशुपालन क्षेत्रातील नवे प्रयोग, आधुनिक साधने व मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार असून, यामुळे शेती विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




