मुंबई : भीमशक्ती रिपब्लिकन सेना (मुंबई) च्या महाराष्ट्र कार्यकारणीॲन्टॉपहिल, मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच

पार पडली. ही बैठक भीमशक्ती–शिवशक्तीचे प्रणेते व राष्ट्रीय अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत होऊ घातलेल्या महाराष्ट्रातील २०२५/२०२६ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार युतीबाबत जो निर्णय घेतील, त्या निर्णयासोबत भीमशक्ती रिपब्लिकन सेना एकमताने आणि मोठ्या ताकदीने उभी राहील, असा ठराव मंजूर करण्यात आला.
तसेच नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत संमत करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर बुधवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष मान. अनिल दगडू कांबळे यांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात जाऊन मान. अजितदादा पवार यांची भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या वतीने मुंबईतील धारावी प्रभाग क्रमांक १८३ (अनुसूचित जाती – महिला) व प्रभाग क्रमांक १८ (सर्वसाधारण – पुरुष) या मतदारसंघांमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढविण्याची परवानगी द्यावी, तसेच २०२६ ब्रृहन्मुंबई महानगरपालिकेत एक स्वीकृत नगरसेवकाचे संवैधानिक पद देण्यात यावे, असे निवेदन सादर करण्यात आले.
मान. अजितदादा पवार यांनी या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद देत ते स्वीकारले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.




