नवी मुंबई(अमोल पाटील) : उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शिवछत्रपती कुस्ती केंद्र सुपनेचा कुस्ती पटू पै. ओंकार भोसले याने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत ब्राँझ मेडल पटकावले आहे. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच विश्रांती पाटील यांच्या हस्ते ओंकार यथोचित सन्मान करण्यात आला.
सुपने येथील कुस्ती केंद्र, ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.ओंकारचे गुरुवर्य वस्ताद प्रशांत पाटील यथोचित सन्मान करण्यात आला व त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.कराड तालुका कुस्ती संघ कला,क्रीडा संस्कृत ट्रस्ट यांच्यावतीने पै. ओंकार भोसले सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी युवा नेते जगदीश पाटील,माजी उपसरपंच अजित अजित जाधव,इनामदार सर,जाधव सर,रमेश थोरात,बाबर वस्ताद, पैलवान अमित गोरे,हर्षदा चव्हाण,हिंदू एकता अध्यक्ष गणेश पाटील,बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील,तानाजी चवरे आप्पा, पैलवान भीमराव कुंभार,वस्ताद प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले व ओंकारचे अभिनंदन केले.यावेळी दिवंगत वस्ताद,जयसिंग दादा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली,
कार्यक्रमावेळी सूत्र संचालन उपसरपंच दादासो पाटील यांनी केले व आभार पैलवान ओंकार यांनी मानले.




