मुंबई(रमेश औताडे) : जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी सुमारे १ कोटी ८० लाख मृत्यू हृदयरोगामुळे होतात. बदलती जीवनशैली, ताणतणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि चुकीची माहिती यांमुळे भारतातही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ . कौशल छत्रपती यांनी याबाबत माहिती दिली.
जगभरात हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असताना, प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. कौशल छत्रपती यांनी “ हार्टस्ट्राँग ” हे मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित केले आहे.
३१ वर्षीय एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला होता. तो दिसायला फिट असतानाही हा प्रकार घडला. “फिट दिसणे म्हणजे आरोग्यदायी असणे नव्हे,” असा महत्त्वाचा संदेश ते देतात.
रुथ अँड सोशल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेले हे पुस्तक पहिल्या आवृत्तीत हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




