प्रतिनिधी : राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष, माजी समाजकल्याण बबनराव (नाना) घोलप यांच्या आशीर्वादाने तसेच राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीम. सरोज बिसुरे ताई यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५.३० वा. स्थळ : हर्ष सभागृह, तुलसी विहार हॉटेल जवळ, सेक्टर- १, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई – ६७ येथे मुंबई स्थित राष्ट्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाचा पदाधिकारी निवड मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्यात मुंबईच्या सध्याच्या कार्यकारिणीचा आढावा घेऊन नवनियुक्त्या, संघटना बांधणी व गटई चर्मकार बांधवांच्या समस्यांवर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. तरी मुंबईत समाजकार्य करू इच्छुक असणार्या समाजबांधवांनी पंढरीनाथ पवार यांना (9820158049) याक्रमांकावर संपर्क साधावा.
तरी कृपया वेळात वेळ काढून समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. शांताराम पांडुरंग कारंडे
प्रदेशाध्यक्ष यांनी समस्त चर्मकार बांधवांना केले आहे.



