ताज्या बातम्या

जी.के.एस.महाविद्यालय खडवलीच्या विद्यार्थ्यांनी आंतरमहाविद्यालयीन बॉक्स क्रिकेट स्पर्धेत मिळवला विजय

मुंबई (शांताराम गुडेकर) : कल्याण येथील के.एम. अग्रवाल महाविद्यालय,यांच्यावतीने आंतरमहाविद्यालयीन बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या मैदानात केले होते.या बॉक्स क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे जी.के. एस.कला,वाणिज्य,व विज्ञान महाविद्यालय खडवली येथील विद्यार्थ्यांनी दणदणीत विजय मिळविला.या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका सौ.हर्षला विशे मॅडम व प्रशिक्षक श्री.बाळाराम चौधरी सर यांचे सक्षम मार्गदर्शन मिळाले.या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी कुमार प्रशांत मुकणे या विद्यार्थ्याने कॅप्टनची भूमिका उत्कृष्ट पणे पार पाडली.तसेच कु.निशांत दिनकर, कु. अजय भगत, कु. रोहित ठाकर, कुमार नमन लोगे, कु. मयुर लोणे, कुमार कु. लोणे, कु. वंश वारघडे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या संचालीका सौ.कविता शिकतोडे मॅडम, तसेच प्राचार्य डॉ.एस.जी.सागर सर,उप प्राचार्य प्रशांत तांदळे सर तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी क्रीडा शिक्षक सौ.हर्षला विशे मॅडम,प्रशिक्षक श्री.बाळाराम चौधरी सर व विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top