सातारा : साताऱ्यात 99 वे साहित्य संमेलन होणार असून. हे संमेलन ‘न भूतो भविष्यती’ करण्याचा चंग सातारकरांनी मांडला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपूरी शाखा, मावळा फौंडेशन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी व शिष्ट मंडळाने संमेलनासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र शासन, मान्यताप्राप्त सहाय्य धर्मादाय आयुक्त संलग्न व आयएसओ मानांकनप्राप्त स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत अक्षरगणेशाकार डाॅ.संदीप डाकवे यांच्या संकल्पनेतून ‘एक अक्षरगणेशा साहित्य संमेलनासाठी’ असा उपक्रम राबवला होता. या उपक्रमात अक्षरगणेशा रेखाटून घेणाऱ्याकडून मुल्य स्वीकारण्यात येत होते. त्यातून जमलेली रु.2,999/- ची रक्कम ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी नुकतीच सुपुर्द केली. या उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण सिक्कीमचे माजी राज्यपाल व माजी खा.श्रीनिवास पाटील यांनी केले होते. विशेष म्हणजे संदीप डाकवे संमेलनाच्या साहित्यिक व ऐतहासिक दालन समितीमध्ये काम करत आहेत.
विक्रांत केसरकर (वसई), सौ.अलका ढवळे (कोळेवाडी), सौ.प्रतिभा खिलारे, संदीप ढाणे (फौजी), संदीप मोहिते (श्रेया ऑप्टिकल), ॲड.दत्तात्रय पवार (मुंबई), महेश माने (मान्याचीवाडी) यांनी या उपक्रमात विशेष सहभाग घेतला होता.
अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांनी 78 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.केशव मेश्राम, 86 व्या संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले, 87 व्या संमेलनाचे अध्यक्ष फ.मु.शिंदे आणि 89 व्या संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या भेटी घेतल्या आहेत. पैकी नागनाथ कोतापल्ले यांना डाकवे यांनी त्यांचे स्केच दिले असून फ.मु.शिंदे यांची स्वाक्षरी घेतली आहे.
अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांची जन्मतारीख 9 जानेवारी, अक्षरगणेशा उपक्रमातून मदत करण्याचे त्यांचे हे 9 वे वर्ष, साताऱ्यात 99 वे साहित्य संमेलन होत असल्यामुळे अक्षरगणेशाचे मुल्य रु.99 व त्यापटीत स्वीकारत असल्याने अक्षरगणेशात 9 अंकाची कमाल दिसून आली. विशेष म्हणजे डाकवे यांनी अक्षरगणेशातून मदत केलेल्या उपक्रमाचे हे 9 वे वर्ष असा अनोखा योगायोग जुळून आला आहे.
संदीप डाकवे हे गेली सुमारे 20 वर्षापासून अक्षरगणेशा उपक्रम राबवत आहेत. अक्षरगणेशा व कलात्मक उपक्रमांच्या माध्यमातून मंदीर जीर्णोद्धारासाठी रु.63 हजार, नाम फाऊंडेशनला रु.35 हजार, केरळ पुरग्रस्तांना रु.21 हजार, अन्नदानासाठी 14 हजार 778, विविध सामाजिक उपक्रमासाठी 10 हजार, विद्यार्थ्यांच्या फी साठी रु.6 हजार, वैद्यकीय उपचारासाठी रु. 6 हजार, ईर्षाळवाडी आपत्तिग्रस्तांसाठी रु.5 हजार 555, ईशिता पाचुपतेला रु.5 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला रु.5 हजार, भैरी पाणी योजनेसाठी रु. 5 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना रु.5 हजार, लातूर जिल्हयातील अवधूत माळी यांना रु.5 हजार, मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 ला रु.4 हजार, मुख्यमंत्री सहायता निधीस रु.3 हजार, शांताई फौंडेशनला 2 हजार 222, भारत के वीर या खात्यात रु.1 हजार, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक रु.1 हजार (प्रतिवर्षी) अशी रोख स्वरुपात मदत केली आहे.
अक्षरगणेशाकार असलेले संदीप डाकवे यांची 12 पुस्तके प्रकाशित झाली असून 6 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांनी साहित्य चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी स्पंदन चॅरिटेबल टस्टच्यावतीने दिवाळी अंक स्पर्धा, निबंध स्पर्धा, वार्तांकन स्पर्धा, पुस्तकांनी मान्यवरांचे स्वागत, साहित्य पुरस्कार, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, पुस्तकांचं झाड, स्व.राजाराम डाकवे (तात्या) सार्वजनिक वाचनालय, पुस्तक भेट अभियान, पुस्तकांची आरास, पुस्तकांची गुढी, शासनाच्या वाचन संकल्प उपक्रमात सहभाग, ग्रंथालयांना पुस्तके वाटप, स्पंदन एक्सप्रेस इ.प्रकारचे मधून लिखाणाला प्रोत्साहन वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे.
संदीप डाकवे यांनी राबवलेल्या विविध उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तीनदा, वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड बुक मध्ये दोनदा आणि हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, द ग्रेटेस्ट इंडियन मध्ये एकदा झाली आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी 30 पेक्षा जास्त स्पेशल रिपोर्ट तर सहयाद्री दूरदर्शन वाहिनीवर अर्ध्या तासाची मुलाखत प्रसारित केली आहे. संदीप डाकवे यांच्या या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी 75 पेक्षा जास्त तर महाराष्ट्र शासनाने 6 पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले आहे.
अक्षरगणेशा उपक्रमातून साहित्य संमेलनासाठी खारीचा वाटा म्हणून रु.2,999 ची मदत देवून डाॅ.संदीप डाकवे व स्पंदन ट्रस्टने अक्षरगणेशातून मदत ही परंपरा जपली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




