तळमावले/वार्ताहर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलदरेच्या विद्यार्थ्यांनी बाल लघु नाटिका स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धा 2025-26 या स्पर्धेमध्ये कराड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक दिलशाद मुल्ला, विकास देसाई यांचे अभिनंदन पालक वर्गातून होत आहे. बिपिन मोरे सो. ग.शि.अ., जमीला मुलाणी, आनंदा धायगुडे केंद्रप्रमुख यांनी जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या.
बेलदरे शाळेचे उत्तुंग यश
December 18, 2025 / 1 minute of reading




