मुंबई (सौ.मनस्वी महेंद्र मनवे /शांताराम गुडेकर) :
सांस्कृतिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात लोककलेची संपन्न परंपरा आहे.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर आणि लोककलावंतांनी विविध लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि जनजागृतीचे अमूल्य कार्य केले.आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा हा अविभाज्य भाग आहे. तथापि, काळाच्या ओघात अनेक लोककला लोप पावत असताना कोकणातील काही गाव-खेड्यांत या कला अजूनही सणासुदीला जिवंत राहिल्या आहेत. त्या मर्यादित न ठेवता पारंपरिकतेबरोबर आधुनिकतेचा संगम साधून त्या अधिक व्यावसायिक बनाव्यात, यासाठी कोकणातील अनेक संस्था आणि कलावंत प्रयत्नशील आहेत.
कोकणात जन्म घेण्याचे आपल्या हातात नसते पण कोकणात जन्माला यायला देखील भाग्य लागतं. आणि म्हणूनच कोकणच्या मातीशी आणि संस्कृतिशी आपली नाळ जोडलेली असते.वाड वडिलांनी जोपासलेली कोकणची संस्कृती आणि कोकणीची लोककला म्हणजे बहुरंगी नमन
रसिकांच्यासेवेसाठी दिवा नगरीत घेऊन येत आहेत नमन कार्यक्रम.निर्माता/लेखक/दिग्दर्शक- अविनाश गराटे यांच्या कल्पनेतून सजलेली गण गवळण आणि मुलगी नको राजघराण्याला वारस मुलगा हवा असा अहंकारी राजा व त्याचा आत्याच्यार सहन करुन मुलीशिवाय घराला घरपण नाही हे पठवून देणारी एका कलंकित सौभाग्यवती” ची चित्तथरारक कहाणी वगनाट्य स्वरूपात घेऊन येत आहोत.तसेच सुप्रसिद्ध शाहीर सुशांत गराटे यांच्या आवाजात गण गवळणींची सुपरहिट बहारदार गाणी रंगणार आहेत.गीतकार – शाहिर अनिल गराटे,गायक – सुमधुर आवाजाचे लोकप्रिय शाहिर सुशांत गराटे,सहगायक – राकेश जाखळ/सचिन पानगले/चेतन घेवडे,कोरिओग्राफर – पवन पाटमासे,कीबोर्ड – केतन साळवी,अक्टोपॅड – कुंदन साळवी,ढोलकी/मृदूंग-परशुराम गावडे
नियोजन-सागर गांगरकर,रमेश हतपले,सुरज पानसरे, मनीष लोखंडे,बॅनर आणि सोशिअल मीडिया प्रसिद्धी -अक्षय परब/राजेश खापरे/अक्षय नेवेरकर,नृत्यांगणा- स्नेहा बोरले,समृद्धी मगर,तेजस्वी मायंगडे, सानिका नलावडे ,साक्षी कदम,प्रियांका गोसावी .
कलाकार-अक्षय परब,निलेश कदम,प्रशांत कातकर, सचिन पानगले, सनी जाधव,यश यादव,अजय ओर्पे, अक्षय सोलकर,मयूर खाडे,अमोल लिंगायत,सुरज लिंगायत,विकी काताळे,पवन धोपट,विनय वाळंज गणेश दवंडे सर आणि अविनाश गराटे असून हा कार्यक्रम पहायला विसरू नका.संपूर्ण फॅमिली एकत्र बसून पहावा असा अप्रतिम कार्यक्रम म्हणजेच अविअनिल कलामंच यांचे लोकप्रिय बहुरंगी नमन. दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता – ग्लोबल हायस्कूल ग्लोबल मैदान- दिवा पूर्व येथे सादरीकरण होणार आहे.तिकीट दर फक्त-१२०/- आहे.तरी रसिकहो आपण या कार्यक्रमला मोठया संख्येने उपस्थित राहून कोकणच्या लोक कलेचा आनंद घ्यावा अशी विनंती अविअनिल कलामंच सर्व सभासदतर्फे करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधांन्य दिले जाणार असून कार्यक्रम बाबत अधिक माहिती व तिकीट साठी अनिल गराटे – ९७०२१३७७८०,निलेश कदम-७९७७०६७३५६,सचिन पानगले-९५९४५९८०७३,राजेश खापरे – ९८९२९७६१५०, रमेश हतपले-९६१९६५८५६१,प्रशांत कातकर -९७६४2 ६२७९९,सागर गांगरकर -९८५०९३७७८३
अविनाश गराटे ९५९४९४७९१२,गणेश दवंदे ९१५२९८७३८७ यांच्याशी संपर्क करावा.




