ताज्या बातम्या
मराठी शाळांच्या गळचेपीविरोधात पालिकेवर मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारल्यानंतर हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलनएसआरएवर मोर्चा नेण्याचा धारावी बचाव आंदोलनचा इशारा* हजारो लोकांना धारावीबाहेर स्थलांतरीत करावे लागेल डीआरपीच्या भूमिकेने धारावीत संतापलेझीमच्या माध्यमातून महाराष्ट्राची शान थेट लाल किल्ल्यावरस्त्री हक्कांच्या नव्या पर्वाची सुरुवात : समानतेचा निर्धार…. महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची तीन दिवसीय राज्यव्यापी परिषद; २०, २१ आणि २२ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये स्त्री चळवळीचे नेतृत्व एका मंचावरअक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांचा साहित्य संमेलनासाठी खारीचा वाटा

पनवेल आजीवली येथे हरिनामाचा आवाज दुमदुमणार

पनवेल(अमोल पाटील) : आजीवली तालुका पनवेल येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ यांच्या वतीने दिनांक १८ १२ २०२५ रोजी प्रारंभ होत असून त्याची सांगता २५ १२ २०२५ रोजी होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ पंधराव्या वर्षात पदार्पण करत आहे. पनवेल परिसरातील या अखंड हरिनाम उत्सवामध्ये भक्ती, नामस्मरण आणि सामूहिक उपासनेचा एक पवित्र सोहळा आहे.अखंड हरिनाम उत्सवात हरि, विठ्ठल, राम, कृष्ण यांसारख्या भगवंतांच्या नामाचा २४ तास (किंवा अधिक काळ) अखंड जप व कीर्तन केले जाते. या काळात नामस्मरण थांबत नाही—गावकरी, भक्त मंडळी आलटून-पालटून हरिनाम घेतात.
या उत्सवामुळे मनःशांती आणि आध्यात्मिक शुद्धी होते,गावात/समाजात ऐक्य व सद्भावना निर्माण होते,नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते.
वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असा उपक्रम आहे.
दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम उत्सवामध्ये दैनंदिन कार्यक्रमात काकड आरती ज्ञानेश्वर पारायण व्याख्यान हरिपाठ कीर्तन होत असते. गुरुवार दिनांक १८. १२ .२०२५ रोजी ह .भ .प .उद्धव महाराज चोले (बीड) , शुक्रवार दिनांक १९.१२.२०२५ रोजी ह .भ. प .संजय वेळूकर (सातारा), शनिवार दिनांक २०.१२.२०२५ रोजी ह. भ. प. विशाल खोले (मुक्ताईनगर), रविवार दिनांक २१.१२.२०२५ रोजी ह. भ. प. सुरेश पाटील (बेलवली), सोमवार दिनांक २२.१२.२०२५ रोजी ह.भ . प.निवृत्ती देशमुख (इंदोरी), मंगळवार दिनांक २३.१२.२०२५ रोजी ह. भ .प. गणेश महाराज भगत (पुणे) यांचे कीर्तन सायंकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत होणार आहेत. तर बुधवार दिनांक २४.१२.२०२५ रोजी सायंकाळी ४.०० ते ६.०० दिंडी सोहळा व दीपस्तव होणार आहे. बुधवार दिनांक २४.१२.२०२५ रोजी ह.भ .प . सुदाम महाराज पानेगावकर (बीड) यांचे कीर्तन तसेच गुरुवार दिनांक २५. १२.२०२५ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० ह.भ . प.जयवंत महाराज बोधले (पंढरपूर) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
आजीवली मध्ये या अखंड हरिनाम उत्सवाच्या निमित्ताने हरिनामाच्या गजराने, टाळ मृदंगाच्या आवाजाने भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. अखंड हरिनाम उत्सवामध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नागरिकांना हरिनामाची ग्रंथराज कंठभूषण करून सेवा करता येणार आहे. या उत्सवामध्ये महाराष्ट्रातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ह. भ प विश्वनाथ रघुनाथ पाटील ( अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजीवली) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top