ताज्या बातम्या

सिंगापूर, जर्मनी, एस्टोनिया देशांतील विद्यार्थ्यांची नवी मुंबई महानगरपालिकेस अभ्यास भेट

प्रतिनिधी :


नवी मुंबई शहराची ओळख आधुनिक शहर म्हणून सर्वदूर असून अनेक देशी-परदेशी अभ्यासक, विद्यार्थी नवी मुंबई शहराला भेटी देऊन नवी मुंबईतील नाविन्यपूर्ण प्रकल्प, उपक्रम यांची माहिती घेत असतात. अशाच प्रकारे आज सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी समुहाने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट देऊन विविध प्रकल्प, कामांची माहिती व त्यामधील वेगळेपण जाणून घेतले.

रिलायन्स फाऊंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ॲण्ड रिसर्च या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सिंगापूर मॅनेजमेंट युनिर्व्हसिटीच्या 20 विद्यार्थी समुहाने आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. यावेळी महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी महापालिका सल्लागार समुहाने महानगरपालिका क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांची व उपक्रमांची माहिती संबंधित अभ्यासगटास दिली. यामध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापन, मलनि:स्सारण व्यवस्थापन, घनकचरा संकलन व प्रक्रिया व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर, दैनंदिन स्वच्छता. प्रदूषण प्रतिबंधात्मक कार्यवाही, स्वच्छताकर्मींना वेळोवेळी दिले जाणारे प्रोत्साहन, व्यसनमुक्तीसह जनजागृती, आरोग्य सेवा-सुविधा, बांधकाम – पाडकाम साहित्यापासून पेव्हर ब्लॉक तयार करणे, प्लास्टकमुक्त शहरासाठी करण्यात येणा-या उपाययोजना, वस्त्र कच-यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प – अशा विविध प्रकल्पांबरोबरच सुक्या कच-यापासून वीज निर्मिती, ओल्या कच-यापासून बायोगॅस अशा संभाव्य प्रकल्पांबाबत देखील तपशीलवार सादरीकरण करून माहिती देण्यात आली.

अशाचप्रकारे काल 10 डिसेंबर रोजीही रायन इंटरनॅशनल स्कुल या शाळेच्या माध्यमातून जर्मनी आणि इस्टोनिया या दोन देशांतील 40 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट देऊन शहराच्या वैशिष्ट्यांची माहिती जाणून घेतली.

या तिन्ही देशांतील महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासगटांनी भारतातील शहरांमध्ये जाणवणारे नवी मुंबईचे वेगळेपण अधोरेखित केले असून अनेक वेगळ्या गोष्टी अनुभवता आल्या अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top